ना सरकारी कलेक्टर, ना कमिश्नर— पण जबाबदार शहरे
न्यूझीलंडचा अनुभव: नगरसेवकांद्वारे प्रशासनप्रमुखाची नियुक्ती, मुद्रांकशुल्काचा अंत आणि स्वायत्त पोलिसव्यवस्था मेरी रिचर्डसन न्यूझीलंडमधील आधुनिक शहर (स्मार्ट सिटी) क्राइस्टचर्च येथे महानगरपालिकेच्या प्रशासनप्रमुख आहेत. कार्यक्षमता, आर्थिक शिस्त आणि सुधारीत प्रशासन ह्यांवर भर देत त्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा झाल्या. सन २०२५ मध्ये त्यांना पगारवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला गेला. मात्र “सध्या अनेक नागरिक आर्थिक दबावांचा सामना करत …